व्यापारी मारहाण प्रकरणातील तिघांना अटक ; गांधीनगर पोलिसांची कारवाई

Admin

गांधीनगर : डिजिटल हॅलो प्रभात 
दुकानात घुसून गांधीनगर येथील दोघा व्यापाऱ्यांना मारहाण करून गंभीर जखमी केलेल्या वेदांग शिवराज पोवार (वय 23,रा. बिंदू चौक कोल्हापूर), मयूर उर्फ जिनु महेश सोळंकी (वय 28,मुळ राहणार ताराबाई पार्क कोल्हापूर, सध्या रा. मुक्त सैनिक वसाहत कोल्हापूर), पृथ्वीराज उर्फ साहिल सायबु कांबळे (वय 19 रा. विचारे मळा सदर बाजार कोल्हापूर) या तिघा संशयितांना गांधीनगर पोलिसांनी पुणे येथुन अटक केली.


गांधीनगर मेन रोडवरील पूनम होजिअरी या दुकानात घुसून व्यापारी कैलास गोवालदास कटार व संजय हेमनदास चुगानी (रा. गांधीनगर) यांना अक्षय चावला,बाल्या मिसाळ व त्यांच्या अज्ञात चार साथीदारांनी खुर्च्या, स्टूल, स्टीलच्या बाटलीने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या संशयित आरोपींचा माग गांधीनगर पोलीस घेत होते. आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज, वरून ठावठिकाणा, त्यांचे बसणे उठणे व मित्र परिवार, आणि ते वापरत असलेल्या वाहनांची माहिती घेतली. त्यांचे लोकेशन घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान संशयित पुणे येथे असल्याचे सूत्राकडून समजतात सहाय्यक पोलीस दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के, गुन्हे शोध पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन सावंत, पोलीस कॉन्स्टेबल रोहन चौगुले, यांच्या पथकाने पुणे येथे चार चाकी वाहनाने हे तिघे जात असताना गाडीचा पाठलाग करत त्यांना पकडून अटक केली.
अध्याप मुख्य आरोपी अक्षय चावला आणि बाल्या मिसाळ या दोघांसह एक संशयित आरोपी बेपत्ता असून गांधीनगर पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
Tags
To Top