भरधाव ट्रकने भर रस्त्यात 18 वर्षाच्या युवकाला चिरडलं...

Admin
धुळे : डिजिटल हॅलो प्रभात
पुणे शहरात घडलेली हिट अँड रनची घटना ताजी असतानाच धुळ्यातही अशीच एक घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने 18 वर्षाच्या युवकाचा जीव घेतला आहे. राहुल योगेश सूर्यवंशी असं मयत झालेल्या युवकाचं नाव आहे. ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक ड्रायव्हरला लोकांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. दरम्यान, शहरात नियमबाह्य अवजड वाहनांची वाहतूक होत असून पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात हे देखील समोर आलं.

अवजड वाहनांकडे दुर्लक्ष
शहरात सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी आहे. असं असताना देखील दुपारच्या सुमारास ही अवजड वाहने शहरातून जात असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेच आता 18 वर्षाच्या तरूणाला जीव गमवावा लागला.

रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. धुळे शहरातील एलएम सरदार हायस्कूल परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या बारा चाकी ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन राहुल सूर्यवंशी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ट्रकच्या मागील चाकात आल्याने तो चिरडला गेला. राहुलहा दत्त मंदिर चौकातून दुचाकी वाहनवरून घराकडे जात असताना ही घटना घडली. दरम्यान  घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकला नागरिकांनी शहरातील पंचवटी परिसरात अडवून ट्रक चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केलं. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
To Top