...त्यांचं संतुलन बिघडलं असावं ; 400 पार फक्त वल्गनाच
May 03, 2024
पुणे : डिजिटल हॅलो प्रभात
लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला किती जागा मिळतील याबद्दल शरद पवार यांनी प्रथमच भाष्य केलं आहे. पवारांनी जागांचा आकडा सांगितला आहे. इंडियन एक्स्प्रेसला शरद पवार यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान मोदींकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यांबद्दल नाराजीही व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी यांनी भटकती आत्मा म्हणत शरद पवारांवर टीका केली. त्यांच्या या विधानाबद्दल शरद पवार म्हणाले की, “त्यांचं संतुलन बिघडलं असावं. कारण आतापर्यंत कोणतेही पंतप्रधान अशा पद्धतीने बोलले नाहीत.
भाजप प्रणित एनडीए आघाडीला लोकसभा निवडणुकीत २३० किंवा २४० पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता नाही”, असा राजकीय अंदाज शरद पवारांनी व्यक्त केला.याबद्दल अधिक बोलताना शरद पवार म्हणाले की, “त्यांनी (मोदी सरकार) दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर केलेल्या कारवाईमुळे पंजाब आणि हरयाणा सारख्या राज्यात संताप आहे. त्यांना दक्षिणेकडील राज्यांत किंवा पश्चिम बंगाल किंवा अल्पसंख्यांकांची मते आणि इतर मते मिळणार नाही. मला व्यक्तीशः असं वाटतं की, ते (भाजप प्रणित एनडीए) 230-240 जागा ओलांडू शकणार नाहीत.
Tags
Share to other apps