सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
सांगली लोकसभा निवडणूक २०२४ भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी शनिवारी जत तर रविवारी मिरज दौऱ्यावर आहेत. जत येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे. मिरजेत विकसित भारत @ २०४७ या विषयावर संवाद साधणार आहेत शनिवार दि. ४ मे रोजी खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार मार्केट यार्ड जत येथे जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी ५.०० वाजता ही सभा होणार आहे. जत तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील भाजपा महायुतीचे कार्यकर्ते व नागरिक या सभेला गर्दी करणार आहेत. रविवार दि. ५ मे रोजी सकाळी ८.३० वाजता मिरजेत विकसित भारत @ २०४७ या विषयावर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे हा कार्यक्रम होईल. नितीनजी गडकरी हे या सभेला संबोधित करणार आहेत.