'विशाल' विश्वजीतसह पोहोचले दिल्लीत ; विशाल पाटलांचे काँग्रेसला समर्थन...

Admin

मुंबई : डिजिटल हॅलो प्रभात 
महाराष्ट्राच्या लोकसभे रणांगणात जास्त चर्चा रंगलेली होती ती, सांगलीच्या जागेची. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरुन  काही प्रमाणात वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, त्यातूनही काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सांगलीतून दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर विशाल पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसलाच पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आज विशाल पाटील यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. आमदार विश्वजीत कदम देखील या वेळी उपस्थित होते. राहुल गांधी देखील विशाल पाटील आणि विश्वजीत कदमच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थन दिले. दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेत विशाल पाटील यांनी दिले. काँग्रेसला समर्थनचे पत्र दिले. विशाल पाटील तांत्रिकदृष्ट्या अपक्ष उमेदवार आहेत.

विश्वजीत कदम यांनी सांगितलं, मी आणि सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील आम्ही दोघांनी मल्लिकार्जून खरगे, के सी वेणुगोपाल, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. विशाल पाटील यांनी काँग्रेससोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. पण आज खासदार म्हणून इंडिया आघाडीच्या पाठीशी राहणार असून, तसं लेखी पत्र दिलं आहे. निवडून आलेले खासदार विशाल पाटील काँग्रेस पक्षाचे कार्यक्रते, नेते आहेत. नाईलाजाने त्यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. सांगलीच्या जनतेने, लोकांनी त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

विशाल पाटील म्हणाले,आम्ही उमेदवारीसाठी अटीतटीची प्रयत्न केले. माझ्यावर एवढं प्रेम असल्याने बिनशर्त पाठिंबा असल्याचं पत्र खरगे यांच्याकडे सोपवलं आहे. यापुढील काळात आम्ही काँग्रेस पक्षासोबतच संसदेत काम करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांचीही भेट घेऊन पाठिंबा देत असल्याचं कळवलं. तसंच पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला. 
Tags
To Top