सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर अत्यावश्यक लसी उपलब्ध करा : भगवानदास केंगार

Admin

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर अत्यावश्यक लसी 
उपलब्ध करा : भगवानदास केंगार 
सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
 
पावसाळा चालू असल्यामुळे खेडोपाडी गावातील शेतकरी व कामगार.शेतमजुर शेतामध्ये काम करत असतात अशा प्रसंगी सर्पदंश विंचूदंश किंवा इतर कारणास्तव शेतकरी व कामगार जखमी होतात त्यावेळी त्यांना नजीकच्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रथम उपचार करणे गरजेचे असते परंतु काही ठिकाणी सर्पदंश व विंचुदंष यावरील लस या आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध नसतात व काही ठिकाणी डॉक्टर्स वेळेवर हजर नसतात त्यामुळे त्या जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी मिरज किंवा सांगली यासाठी घेऊन जावे लागते अशावेळी रुग्णांना उपचार वेळेवर मिळणे गरजेचे असते परंतु रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याकारणाने काही ठिकाणी पेशंट मिरज सांगली ला पोहोचण्या अगोदरच पेशंट दगावतात.अशा घटना काही गेल्या दिवसांमध्ये घडलेले आहेत तसेच विटा येथे एका बालकाला सर्पदंश झाल्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तो बालक दगावला. म्हणून विशेषत जत तालुक्यातील 1 उपजिल्हा केंद्र 8 प्राथमिक आरोग्य केंद्र व 45 उपकेंद्रसह व या जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर यावरच्या लसी उपलब्ध करण्यात यावेत व अशा ठिकाणी 24 तास इमर्जन्सी डॉक्टर्स सुद्धा उपस्थित असणे गरजेचे आहे.गेल्या वर्षभरात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेक रुग्ण दगावले आहेत.

गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये संर्पदशामुळे अनेक रुग्ण दगावले आहेत. त्यांना शासनाच्या विविध योजनेतून नुसकान भरपाई अजून मिळालेले नाहीत. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे काही प्रकरणे प्रलंबित आहेत त्यामुळे लवकरात लवकर मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी व कामगार यांच्या वारसदारांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांनी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी यांच्या वती केलेली आहे.
To Top