जनतेची मानसिकता : आ.जयंतराव पाटील
राज्य सरकार बदलण्याची राज्यातील जनतेची मानसिकता असून घाबरलेले सरकार सवंग लोकप्रियतेसाठी घोषणावर घोषणा करीत आहे. येत्या तीन महिन्यात ते चंद्र-तारे ही देवू म्हणतील,असा उपरोधात्मक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथील समारंभात बोलताना दिला. आपण कष्टकरी जनतेच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम करीत आहात,असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
इस्लामपूर येथे राष्ट्रवादी असंघटीत बांधकाम कामगार शरदचंद्र पवार पक्षाच्या वाळवा तालुका,इस्लामपूर शहर व आष्टा शहराच्या वतीने २ हजार कष्टकरी कुटुंबांना भांडी संच वाटप करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. युवा नेते प्रतिकदादा पाटील, संघटनेचे मार्गदर्शक,माजी नगराध्यक्ष सुभाषराव सुर्यवंशी,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील,पै.भगवान पाटील,सभापती संदीप पाटील,संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर चव्हाण,इस्लामपूर शहराध्यक्ष निवास जाधव, आष्टा शहराध्यक्ष प्रकाश पवार,अविनाश गायकवाड,निवास गायकवाड,विक्रम धुमाळ प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी संघटनेच्यावतीने प्रतिकदादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
आ.पाटील म्हणाले...आपले महाविकास आघाडीचे सरकार असताना,आपण असंघटीत कामगारांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन केले. कष्ट करणाऱ्या कुटुंबांना विविध लाभ देताना ऐन संकटात मदतीचा हात देता यावा,हा हेतू होता. सध्या हे महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम असून बांधकाम आणि इतर क्षेत्रात कष्ट करणाऱ्या कुटुंबांना स्थिरता व सुरक्षितता देण्याचे काम मंडळ करीत आहे. हे पाहून समाधान वाटते. भविष्यात जे सहकार्य लागेल,ते देत राहू.
सुभाषराव सुर्यवंशी म्हणाले,आम्ही आ.जयंतराव पाटील,प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटीत कष्टकरी भावा-बहिणींना संघटीत करून त्यांना शासनाचे विविध लाभ मिळवून देत आहे. राज्यात प्रथम आम्ही मुलीच्या लग्नास ५१ हजारांची मागणी करून ते मंजूर करून घेतले. तसेच बंद झालेल्या पेट्या देण्यास सुरुवात केली आहे. यावेळी शहाजी पाटील, संजय पाटील,पुष्पलता खरात,सागर चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. कामगार कल्याण विभागाच्या डॉ.सुनिता सौंदडे यांनी आरोग्य विषयक माहिती दिली.
याप्रसंगी बाळासाहेब पाटील,सुस्मिता जाधव,सुनिता देशमाने, खंडेराव जाधव,पुष्पलता खरात, रणजित मंत्री,संजय पाटील,अरुण कांबळे,शैलेश पाटील, हणमंत माळी,राजकुमार कांबळे,शंकरराव चव्हाण,अनिल पावणे,विलास भिंगार्डे,आयुब हवलदार,दिग्विजय पाटील, अभिजित कुर्लेकर,सूर्याजी पाटील,गुरुराज माने,प्रियांका साळुंखे,तसेच राजकुमार पाटसुते,दत्तात्रय जाधव,शरद यादव,शिवाजी जाधव,दत्तात्रय देसाई,शरद सुर्यवंशी,प्रविण पाटील,पांडुरंग भोसले, रंगराव देशमुख, निवास सोनार,संदीप लोंढे, परशुराम पवार, रंगा पवार,अनुराधा भोसले,संगीता पवार यांच्यासह कष्टकरी स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी अविनाश गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विक्रम धुमाळ यांनी आभार मानले.