जत तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात CEO तृप्ती दोडमिसे यांची भेट

Admin
जत तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात CEO तृप्ती दोडमिसे यांची भेट

सांगली : डिजिटल हॅलो प्रभात 
जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या प्रलंबित घरकुल योजनेतील मंजूर घरे पुढील यादी लवकर मंजुरी देऊन नागरिकांना घरे बांधण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांनी जिल्हा परिषदेचे CEO तृप्ती दोडमिसे यांच्याकडे केली. गेल्या दोन-तीन वर्षापासून पहिली यादी जाहीर करून प्रत्येक गावात 8-10 घरांची प्रकरणे मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर दुसरी यादी जाहीर करण्यास राज्य सरकारकडून विलंब करण्यात आलेली आहे. या विषयाकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहत नाही. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे 2 महिने आचारसंहितेमध्ये गेली. त्यामुळे प्रशासनाचा सर्व योजना कामे ठप्प झालेली आहेत. आता पुन्हा ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुकी मुळे पुन्हा ही योजना व पुढील यादी आचारसंहितेच्या कचाट्यात अडकणार त्यामुळे राज्य सरकारने व जिल्हा प्रशासनाने लवकर पुढची यादी जाहीर करून जत तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व गावातील- शहरातील प्रलंबित राहिलेले दुसऱ्या यादीतील मंजूर झालेली ही कामे लवकर सुरू करावी. 

जिल्हा प्रशासन व राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन ही योजना गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक टप्प्यात गावातील आठ दहा घरे मंजूर करण्यापेक्षा प्रत्येक वर्षी हा कोटा जास्त वाढवून जास्त मागणी असलेल्या गावात 25-30 घरे दुसऱ्या टप्प्यात मंजुरी द्यावी. फक्त जत तालुक्यातच 7-8 वर्षात जवळपास 10 हजार च्या वर घरकुल प्रस्ताव आहेत.मग ही योजना कधी पूर्ण होणार..?
व ही योजना पूर्ण होण्यास पुढील 10 वर्षेही कमी पडतील. याची जिल्हा प्रशासनाने व राज्य सरकारने गंभीर दखल घ्यावी. अशी मागणी सरपंच सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष भगवानदास केंगार यांनी एका निवेदनाद्वारे तृप्ती दोडमिसे यांच्याकडे केले.
To Top