प्रकाश शेंडगे यांनी केली मेळावा स्थळाची पाहणी |
सांगली : हॅलो प्रभात
महाराष्ट्रातील समस्त ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी शिक्षणातील आणि नोकरी मधील आरक्षण टिकवण्यासाठी तसेच मराठा समाजातील सग्या सोयऱ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी उद्या दि. 11 ऑगस्ट रोजी सांगलीत पार पडत असलेल्या ओबीसी एल्गार महामेळाव्याच्या तरुण भारत स्टेडियम स्थळाची ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पाहणी करून सदर महामेळावा निर्विघ्नपणे व सुरळीत पार पडावा यासाठी पदाधिकारी व कार्यकर्यांना योग्य त्या सूचना देत सुरक्षिततेच्या अनुषंगाने पोलिसांशीही चर्चा केली .यावेळी सांगली उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, शब्बीर अन्सारी, मन्नूद्दीन बागवान, संगीता खोत, विष्णू माने, संजय विभूते,अरुण खरमाटे, सविता मदने, कल्पना कोळेकर, भारत खांडेकर, विठ्ठल खोत, उर्मिला बेलवलकर, शंकर हाके, सुनील गुरव,राजू कुंभार, संजय सरगर, ज्ञानेश्वर मेटकरी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .