महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत का ? : भगवानदास केंगार

Admin
महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत का ?  : भगवानदास केंगार
जत : हॅलो प्रभात
गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत की नाही असा सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची धिंडवडे निघत आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री आमदार फोडाफोडीत व्यस्त आहेत. पुन्हा सत्तेत येऊन बसायची स्वप्ने पाहत आहेत. महाराष्ट्रात अनेक पोलीस ठाण्यात पोलिसांचीच अब्रूचे पंचनामे होत आहेत. अनेक पोलीस ठाण्यात पीडित कुटुंबाची दहा-बारा तास तक्रार नोंदवून घेत नाहीत. राज्यात अनेक पोलीस ठाण्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढतोय. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण सरकार..गुन्हेगार कोणत्या जातीचा आहे.कोणत्या धर्माचा आहे. कोणत्या पक्षाचा आहे हे बघून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहेत हे निषेधार्थ आहे.गृहमंत्र्यांचे लक्ष आहे कुठे..? गृहमंत्र्यांचे फक्त लक्ष दिल्लीकडे आहे.
राज्यातील बदलापूर पाठोपाठ अंबरनाथ मध्येही एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाला. कोल्हापुर जवळील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. कराडमध्ये ही अशी घटना घडली. या घटने पाठोपाठ महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये असे अन्याय अत्याचार मुली व महिला यांच्यावर होत आहेत हे अत्याचार महाराष्ट्राचे लाडक्या बहिणीचे भाऊ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना या घटनेची गांभीर्य नाही का..? लाडक्या बहिण योजना जरूर राबवा पण त्या बहिणीची सुरक्षेची जबाबदारी पण भावांनी आणि गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे..
निवडणूका डोळ्यासमोर ठेवून लाडक्या बहिणीची मते मिळवण्यासाठी सुरू केलेला लाडक्या भावाने लाडकी बहीण योजनेतील पैसे लाडक्या बहिणीला न देता लाडक्या बहिणीच्या व भाचीच्या सुरक्षेसाठी तो निधी खर्च करावा.. महाराष्ट्रात रोज दिवसा ढवळ्या बलात्कार. गोळीबार. दरोडे पडत आहेत गृह मंत्र्यांचे लक्ष आहे कुठे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे. राज्यातील या घटनेचे गांभीर्य ओळखून गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.. व राहिलेल्या दोन महिन्याचं सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी शिवसेना युवानेते तथा सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.
To Top