सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांची नियमानुसार मिरवणुक |
पन्हाळा : डिजिटल हॅलो प्रभात
कोतोलीतील सार्वजनिक गणेशमंडळांसह घरोघरी प्रतिष्ठापना केलेल्या साडेपाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे शुक्रवारी आनंदोत्सवात विसर्जन करण्यात आले. पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशांच्या गजराबरोबर टाळ-मृदुंगाच्या आवाजाने परिसर दणाणून गेला. पावसाने उघडीप दिल्यामुळे कोतोली तील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी होती.येथील बाॅडी लाईन तरुण मंडळाने सर्वप्रथम दुपारी एक वाजता आपल्या गणेशमूर्तीचे विसर्जन केले.हनुमान तालीम मित्रमंडळाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन शेवटी करण्यात आले. घरातील गणपतीचे विसर्जन हौदामध्ये करण्यास पसंदी दिली.यावर्षी सर्वच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नियमानुसार मिरवणुका काढण्यात आल्या.तसेत वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमानी, महाप्रसाद, हालते देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम आदींवर भर देण्यात आला होता.याचा भक्तांनी लाभ घेतला. पोलिस निरीक्षक बोंबले यांनी पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, होमगार्ड आणि शीघ्र कृती दलातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोतोलीत कडक बंदोबस्त ठेवला.ग्रामपंचाईतीच्या वतीने मानाचा पानिचा विडा व श्रीफळ फेटा देऊन गौरविण्यात आले.यावेळी उपसरपंच अजित पाटील यांच्या सह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.