...पण एन्काऊंटर विरोधकांचा झाला : आ.आशिष शेलार |
मुंबई : हॅलो प्रभात
अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला पण एन्काऊंटर विरोधकांचा झाला आहे. कालपासून त्यांची व पिलावळांची वक्तव्य पाहतोय,हा बेशरमपणा आहे. अफजल गुरुची ‘बरसी’ करता तशी आता अक्षय शिंदेची पण ‘बरसी’ करणार का? असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला.मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. शेलार पुढे म्हणाले की, विरोधकांची काय वक्तव्य आहेत? काय सांगत आहात? काय संदेश आहे? काय अर्थ काढायचा ? थोडा अभ्यास करून बोला. एवढा थयथयाट करताय? काय सांगायचे आहे तुम्हाला?पोलिसांनी गोळ्या खायच्या काय? त्या पिडित बच्चूची मानसिकता तरी समजून घ्या.त्यांनी दिलेल्या पुराव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात? त्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराबाबत, तो झाला की नाही? पोलिसांनी काही नाही केले? या सर्व गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आहे काय? कुठल्या थराला गेला तुम्ही?याचे राजकारण करता की तो अक्षय शिंदे, गुन्हेगार तो लिंगपिसासू त्याची माळ हे जपत आहात? असा थेट सवाल करीत तो लिंगपिपासू आणि हे सत्तापिसासू, अशा शब्दांत ॲड शेलार यांनी हल्लाबोल केला. मा. शरद पवार साहेब तुम्ही काय बोलत आहात ? हलगर्जीपणा? आरोपीने पोलिसांवर हात टाकल्यावर काय त्यांनी भजन करायचे का? पोलिसांच्या बंदुकीचा जो हात घालेल, त्याला ठोकयलाच पाहिजे. आम्ही पुर्णपणे पोलिसांच्या पाठीशी आहोत. उबाठा गट आता ज्या अधिकाऱ्यांनी आरोपीला ठोकले त्या अधिकाऱ्याला आता काय जोडे मारो करणार काय? असा खोचक सवाल ही त्यांनी केला.