अजितदादा क्रीडा महोत्सव २०२४ चे आयोजन

Admin


अजितदादा क्रीडा महोत्सव २०२४ चे आयोजन


अजितदादा क्रीडा महोत्सव २०२४ चे आयोजन 

लोणी काळभोर : विकास काळभोर

राष्ट्रवादी क्रीडा काँग्रेस, हवेली तालुका अध्यक्ष किरणदादा राजाराम वाळके यांच्या वतीने आयोजित अजितदादा क्रीडा महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भव्य फुलपीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक म्हणून  ११११११ रु.बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच दुतीय पारितोषिक ७७७७७, तृतीय पारितोषिक ५५५५५,चतुर्थ पारितोषिक ३३३३३ बक्षिस देण्यात येणार असून उत्तम मालिकावीर म्हणुन टू व्हीलर ॲक्टिवा गाडी देण्यात येणार आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ. आज  5 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ४ वाजता पालखीतळ, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर येथे होणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये रूपालीताई चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोग, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, आमदार चेतन तुपे , आमदार सुनील टिंगरे, आमदार अतुल बेनके, आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारडकर, सुरेश आण्णा घुले, रवी बापू काळे उपस्थित राहणार आहेत. 

 या स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणुन शांताराम कटके,बाजार समिती सभापती दिलीप काळभोर,महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर,सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सिताराम लांडगे,लोणी काळभोर उपसरपंच रत्नाताई राजाराम वाळके, राष्ट्रवादी काँग्रेस हवेली तालुका युवक अध्यक्ष युवराज काळभोर, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सचिन वाघुले, सिद्धेश्वर काळभोर, स्वप्निल काळभोर, सतीश काळभोर, नवनाथ तात्या गायकवाड, सचिन काळभोर, निकिताताई पवार, रंजिताताई गाढवे ,रमेश काळभोर उपस्थित असणार आहेत.  

To Top