शारीरिक व मानसिक आरोग्यासह
पर्यावरणासाठी अभिनव उपक्रम
पुणे : हॅलो प्रभात
ग्रॅन्यूल्स ग्रीन हार्टफुलनेस रन या जागतिक उपक्रमाचे आयोजन 1 डिसेंबर 2024 रोजी सकाळी ६ वाजता पुण्यात होणार आहे. वाघोली येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल येथे सुरू होणारी आणि नगर रोडवरून परत येणारी ही स्पर्धा हार्टफुलनेस संस्थेने कमलेश डी. पटेल (दाजी) यांच्या मार्गदर्शनाखाली युवा व क्रीडा मंत्रालय व फिट इंडिया मूव्हमेंट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. देशभरात ८० ठिकाणी होणारी ही मॅरेथाॅनमध्ये जवळपास ४०,०००+ लोक एकत्र येणार आहेत. या मॅरेथाॅनचा उद्देश शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य वाढवणे तसेच पर्यावरणीय शाश्वतता टिकवणे हा आहे. या रनमध्ये सहभागी होणाऱ्यांना 1 किमी, 3 किमी, 5 किमी, व 10 किमी या श्रेणीमध्ये सहभागी होण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच, या उपक्रमातून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग 10,000 झाडे लावण्यासाठी करण्यात येईल. या मॅरेथॉनला डॉ. जगन्नाथ दीक्षित, डायबेटीस रिव्हर्सल तज्ज्ञ आणि प्रीती मस्के, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक, यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.
आजकाल आपण बहुतेक जण छोट्या कुटुंबांमध्ये राहतो त्यामुळे आपल्याला आधाराची गरज आहे. ही एकत्र उभे राहण्याची, इतरांसाठी विचार करण्याची, आणि दयाळू व करुणामय समाज तयार करण्याची वेळ आहे. आपल्याला चांगुलपणा आणि एकतेचा प्रसार करायचा आहे. प्रत्येक कुटूंबातील व्यक्तीला आधार व मदत देण्यासाठी हार्टफुलनेस समर्पित आहे.
कमलेश डी. पटेल (दाजी)
संस्थापक, हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट