पवारांच्या राष्ट्रवादीत 100 टक्के भाकरी फिरवण्याची वेळ ; माझ्यावर जबाबदारी दिल्यास स्वीकारणार...

Admin

पवारांच्या राष्ट्रवादीत 100 टक्के भाकरी फिरवण्याची वेळ 
माझ्यावर जबाबदारी दिल्यास स्वीकारणार...

पुणे : हॅलो प्रभात 
शरद पवार गटात भाकरी फिरवण्याची शंभर टक्के वेळ आली आहे. राज्य पातळीवरील माझ्यावर जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारेन, असा निर्धार आ. रोहित पवार यांनी केला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 
रोहित पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद मिळणार का माहिती नाही, परंतु पंकजा मुंडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. EVM मध्ये जर सेट केलं नसतं तर महाविकास आघाडीचे 126 आमदार निवडून आले असते. भाजपचा 88 टक्के,  शिंदे गटाचा 70 टक्के आणि अजितदादा गटाचा  69 टक्के स्ट्राईक रेट आहे. 10 टक्के मतं भाजपला EVM वर मिळत होती, ती सेट करण्यात आली होती.  ईव्हीएम मशीन आम्हाला द्यावीत आम्ही त्यावर चौकशी करू,असं आव्हानही रोहित पवारांनी दिलं. एकनाथ शिंदेना धोक्याची जाणीव झाली असून ते गृहमंत्री पद मागत आहेत. ⁠अजित पवार पक्षातील कोण मंत्री होणार हे त्यांनीच ठरवले पाहिजे होते मात्र भाजपच ते ठरवताना दिसते आहे. पंकजा मुंडेंना भाजप मुख्यमंत्री करु शकेल. त्या ओबीसी नेत्या आहेत, त्यांचा अनुभव सुद्धा आहे. त्यामुळे त्यांना देखील संधी मिळू शकेल, असंही रोहित पवार म्हणाले.


लाडकी बहीण योजनेत काही अटी शर्थी टाकल्या जाणार, 2100 रुपये दिले जाणार का? यावर शंका आहे. आम्ही अधिवेशनाची वाट बघत आहोत. कालच्या बैठकीत मीच रोहित पाटलांचे नाव सुचवलंआहे,मला विरोधी पक्षात जी जबाबदारी मिळेल ती स्वीकरणार आहे. हे सरकार सर्वांना लाभ देईल असं वाटत नाही. काही योजना अशा आहेत निवडणुकींच्या आधी घोषणा केल्यात मात्र नंतर त्या बंद झाल्यात. आता लाडकी बहीण योजनेचे काय होतं ते बघूया. असेही रोहित पवार म्हणाले. 
Tags
To Top