कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी..?
शिंदेंच्या शिवसेनेची 12 मंत्र्यांची संभाव्य यादी...
महायुती सरकारचा राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार अंतिम टप्प्यात आला आहे. शनिवारी नागपूर येथे महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडेल. विश्वसणीय माहितीनुसार, शिवसेनेला एकूण 9 मंत्रीपदं आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळणार असून ही यादी जवळपास निश्चित मानली जात आहे. यामध्ये नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याच समजत आहे.शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या संभाव्य यादीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचाही समावेश आहे. हे दोन्ही नेते युतीती सामील झाल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळात शपथ घेतील, असे सांगितले जात होते. मात्र, तेव्हा इतरांना संधी देण्यात यांची संधी हुकली होती.
या दोन्ही नेत्यांना शेवटच्या काळात अनुक्रमे राज्य परिवहन महामंडळ आणि सिडकोचे अध्यक्षपद देऊन शिंदेंनी त्यांची समजूत काढली होती. मात्र,आता पुन्हा सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी न विसरता गोगावले आणि शिरसाट यांना पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली आहे. याशिवाय प्रताप सरनाईक आणि विजय शिवतारे या नव्या चेहऱ्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. हे सगळेजण उद्या होणाऱ्या सोहळ्यात मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील.
शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री
- एकनाथ शिंदे
- भरत गोगावले
- उदय सामंत
- संजय शिरसाट
- शंभुराज देसाई
- गुलाबराव पाटील
- दादा भुसे
- प्रताप सरनाईक