आयईआय स्टुडंट चाप्टरच्या उद्घाटन प्रसंगी अजय देशपांडे, वसंत पंढरकर, डॉ. के. प्रथापन, डॉ. जे. ए. खोत, डॉ. संग्राम पाटील, डॉ. मुरली भूपती आदी
तळसंदे : हॅलो प्रभात
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील कृषी अभियांत्रिकी विभागामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स इंडियाच्या (आयईआय) स्टुडन्ट चाप्टरचे उद्घाटन करण्यात आले. स्टुडन्ट ऑफ इंजिनिअर्स कोल्हापूर लोकल चाप्टरच्या माध्यमातून हा विभाग कार्यरत झाला आहे. भविष्यातील करिअर व रोजगार संधी संशोधन व अध्यापनातील मागणी वेगवेगळ्या विषयावरील प्रशिक्षणे, चर्चासत्रे इत्यादी करिता विद्यार्थ्यांना या स्टुडन्ट चाप्टरचा उपयोग होणार आहे.विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला व चिकित्सक वृत्तीला चालना देण्याकरता कृषी अभियांत्रिकी विभागामध्ये स्टुडन्ट चाप्टर सुरू करण्यात आला. 'कृषी अभियांत्रिकी मध्ये नवनवीन संधी' विषयी अभियंता अजय देशपांडे यांनी तर 'विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे समाजाचा विकास' याविषयी कुलसचिव प्रा. डॉ.जयेंद्र खोत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
'प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक उत्तम संशोधक दडलेला असतो तो विकसित करणे; ही काळाची गरज आहे' असे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांनी याप्रसंगी नमूद केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री वसंत पंढरकर (प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूर) यांनी शहर व रस्ते नियोजन तसेच रस्त्याकडील झाडांची लागवड इत्यादी मधील भविष्यातील रोजगार संधी विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या. यावेळी अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, डॉ. मुरली भूपती, आयईआय कोल्हापूर लोकलचे सचिव अभियंता योगेश चिमटे आणि कृषी अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक, प्राध्यापकतेर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता डॉ.अमोल घाडगे व डॉ.संकेत सावंत यांनी मेहनत केली. कु. साक्षी मोरे व साहिल नदाफ यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. मंगल पाटील यांनी आभार मानले.