पन्नास हजारांची लाच स्वीकारताना
महिला पोलीस हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात
सांगली : हॅलो प्रभात
येथील फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना विश्रामबाग पोलिस ठाण्यातील हवालदार मनिषा नितीन कोंगनोळीकर उर्फ भडेकर (वय ४२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. एका फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच चौकशीकामी मदत करण्यासाठी मनिषा कोंगनोळीकर यांनी एका व्यक्तीकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदारने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. याबाबत सापळा रचण्यात आला. त्यानंतर ही रक्कम स्वीकारण्यासाठी मंगळवारी सांगलीवाडी येथील एका महाविद्यालयाजवळ त्यांनी तक्रारदारास बोलावले. तक्रारदाराकडून कोंगनोळीकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे, ऋषिकेश बडणीकर, प्रितम चौगुले, अजित पाटील, पोपट पाटील, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, अतुल मोरे, अंमलदार सीमा माने, विना जाधव, धनंजय खाडे यांनी केली.