राहुल गांधींनी धक्का मारल्याचा आरोप
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह या केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. यावरुन काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी रान उठवले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप खासदारांना काँग्रेसवरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा ठपका ठेवत गुरुवारी संसदेत निषेध आंदोलन केले. हे आंदोलन सुरु असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप भाजपचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांनी केला. राहुल गांधी यांनी एका खासदारला धक्का दिला. त्यामुळे तो खासदार माझ्या अंगावर पडला आणि माझ्या डोक्याला जखम झाली, असा दावा प्रताप चंद्र सारंगी यांनी केला.दिल्ली : हॅलो प्रभात
राहुल गांधींनी एक खासदाराला माझ्या अंगावर ढकलले, त्यामुळे मी खाली पडलो आणि जखमी झालो. मी पायऱ्यांवर उभा होतो. त्यावेळी राहुल गांधींनी धक्का दिलेला खासदार माझ्या अंगावर पडला : प्रताप चंद्र सारंगी
अमित शहा यांनी माफी मागावी आणि पदाचा राजीनामा द्यावा यासाठी इंडिया आघाडीचे आंदोलन सुरु आहे. या घटनेनंतर इंडिया आघाडीचे खासदारही आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षाचे खासदार मकरदवाराच्या भिंतीवर चढले. नवीन संसदेच्या परिसरात पहिल्यांदाच भिंतीवर चढून आंदोलन करत आहेत., प्रताप सारंगी यांना या प्रकारानंतर तातडीने एअर अँम्ब्युलन्सने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रताप सारंगी यांच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
या संदर्भात राहुल गांधी काय म्हणाले ?
मी संसदेच्या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी भाजप खासदार मला रोखण्याचा प्रयत्न करत होते. ते मला धमकावत होते, त्यावेळी हा प्रकार घडला. मला संसदेत जाण्याचा अधिकार आहे. भाजप संविधानावर आक्रमण करत आहे, हा मूळ मुद्दा आहे.