प्रीसिजन रायडिंग चॅम्पियनशिप उपक्रम आयोजित
पुणे : हॅलो प्रभात बदलत्या युगात रस्ते अपघात ही खूप मोठी समस्या बनली आहे. यावर मात करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व समयसूचकता गरजेची आहे. यासाठी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती,महाविद्यालयामध्ये यीन आणि सुझुकी यांच्या माध्यमातून प्रिसिजन रायडिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात गाडी हळू आणि अचूक पद्धतीने कशी चालवली पाहिजे याबद्दल जागरूकता देण्यात आली. 50 हून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. पीयूष पाटील , प्रथमेश झेंडे या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची पुढील जिल्हास्तरीय फेरीसाठी निवड झाली आहे.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.आकाश दोडके सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते. महाविद्यालयाने हा उपक्रम राबविल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा. प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.