अखेर महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर
कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते ?
महायुती सरकारचे बहुप्रतिक्षित खातेवाटप काल म्हणजेच 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि सामान्य प्रशासन, ऊर्जा, विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही खाती असतील. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्यासह गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क खाते असणार आहे.
कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते ? संपूर्ण यादी
कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते ? संपूर्ण यादी
कॅबिनेटमंत्री
- देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी
- एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण
- अजित पवार - अर्थ, राज्य उत्पादन
- चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
- राधाकृष्ण विखे- पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
- हसन मुश्रीफ - मेडिकल एज्युकेशन
- संजय राठोड - जलसंधारण
- धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा
- मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास
- उदय सामंत - उद्योग आणि मराठी भाषा
- जयकुमार रावल - मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
- चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
- गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
- गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा आणि स्वच्छता
- गणेश नाईक - वनमंत्री
- दादाजी भुसे - शालेय शिक्षण
- पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल, ॲनिमल हसबंडरी
- अतुल सावे - ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी
- अशोक ऊईके - आदिवासी विकास
- शंभुराज देसाई - पर्यटन, खनिकर्म
- प्रताप सरनाईक - परिवहन
- भरतशेठ गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन आणि मिठागर जमीन विकास
- मकरंद जाधव पाटील - मदत आणि पुनर्वसन
- नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे
- आकाश फुंडकर - कामगार
- बाबासाहेब पाटील - सहकार
- प्रकाश आबीटकर - आरोग्यमंत्री
- अॅड.आशिष शेलार - सांस्कृतिक कार्य आणि आयटी
- दत्तात्रय भरणे - क्रिडा आणि अल्पसंख्याक विकास
- आदिती तटकरे - महिला व बालविकास
- शिवेंद्रसिंह भोसले - सार्वजनिक बांधकाम
- अॅड.माणिकराव कोकाटे - कृषी
- जयकुमार गोरे - ग्रामविकास
- नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
- संजय सावकारे - टेक्सटाईल
- संजय शिरसाट - सामाजिक न्याय
राज्यमंत्री -
- माधुरी मिसाळ - नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, मेडिकल एज्युकेशन, अल्पसंख्याक विकास
- मेघना बोर्डीकर – साकोरे - आरोग्य, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला व बालविकास
- योगेश कदम - गृह (शहरी), महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन
- इंद्रनील नाईक - उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन आणि माती व जलसंधारण
- आशिष जयस्वाल - अर्थ, कृषी, मदत व पुनर्वसन, कायदा आणि न्यायालये, कामगार
- पंकज भोयर - गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म