अखेर महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर ; कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते ?

Admin
अखेर महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर 
 कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते ?

मुंबई : हॅलो प्रभात
महायुती सरकारचे बहुप्रतिक्षित खातेवाटप काल म्हणजेच 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि सामान्य प्रशासन, ऊर्जा, विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही खाती असतील. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्यासह गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क खाते असणार आहे. 

कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते ? संपूर्ण यादी

कॅबिनेटमंत्री
  •  देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी
  • एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण
  • अजित पवार - अर्थ, राज्य उत्पादन
  • चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
  • राधाकृष्ण विखे- पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
  • हसन मुश्रीफ - मेडिकल एज्युकेशन
  • संजय राठोड - जलसंधारण
  • धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा
  • मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास
  • उदय सामंत - उद्योग आणि मराठी भाषा
  • जयकुमार रावल - मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
  • चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
  • गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
  • गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा आणि स्वच्छता
  • गणेश नाईक - वनमंत्री
  • दादाजी भुसे - शालेय शिक्षण
  • पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल, ॲनिमल हसबंडरी
  • अतुल सावे - ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी
  • अशोक ऊईके - आदिवासी विकास
  • शंभुराज देसाई - पर्यटन, खनिकर्म
  • प्रताप सरनाईक - परिवहन
  • भरतशेठ गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन आणि मिठागर जमीन विकास
  • मकरंद जाधव पाटील - मदत आणि पुनर्वसन
  • नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे
  • आकाश फुंडकर - कामगार
  • बाबासाहेब पाटील - सहकार
  • प्रकाश आबीटकर - आरोग्यमंत्री
  • अॅड.आशिष शेलार - सांस्कृतिक कार्य आणि आयटी
  • दत्तात्रय भरणे - क्रिडा आणि अल्पसंख्याक विकास
  • आदिती तटकरे - महिला व बालविकास
  • शिवेंद्रसिंह भोसले - सार्वजनिक बांधकाम
  • अॅड.माणिकराव कोकाटे - कृषी
  • जयकुमार गोरे - ग्रामविकास
  • नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
  • संजय सावकारे - टेक्सटाईल
  • संजय शिरसाट - सामाजिक न्याय 
राज्यमंत्री -
  • माधुरी मिसाळ - नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, मेडिकल एज्युकेशन, अल्पसंख्याक विकास
  • मेघना बोर्डीकर – साकोरे - आरोग्य, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला व बालविकास
  • योगेश कदम - गृह (शहरी), महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन
  • इंद्रनील नाईक - उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन आणि माती व जलसंधारण
  • आशिष जयस्वाल - अर्थ, कृषी, मदत व पुनर्वसन, कायदा आणि न्यायालये, कामगार
  • पंकज भोयर - गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म
Tags
To Top