आम्हाला निवडणूकीत थर्ड अम्पायर मिळाला असता तर...
पराजयानंतर काय म्हणाले राज ठाकरे ?
मुंबई : हॅलो प्रभात
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. निवडणूक निकालानंतर राज ठाकरेंनी अविश्वसनीय..तुर्तास एवढंच..अशी पोस्ट केली होती. पण यानंतर राज ठाकरेंकडून काहीच प्रतिक्रिया आली नव्हती. नेत्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी सर्वांची मतं जाणून घेऊन राज ठाकरे प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा साऱ्यांनाच होती.
गुरुपोर्णिमेला दरवर्षी आचरेकर सरांच्या पाया पडायला यायचे. पण आजकालची गुरुपोर्णिमा हॅप्पी गुरुपोर्णिमा मेसेजवर थांबते. इथे आचरेकर सरांचे स्मारक असावे असे मला वाटत होते. इथे मला पुतळा नको होता. इथे स्टम्प, बॅट, सर्व आहे. यावर आचरेकर सरांची कॅप आहे. कॅप त्यांची ओळख होती. क्रिकेटमध्ये थर्ड अम्पायर असतो. त्यावेळी चुकीचा निर्णय बदलता येतो. निवडणूकीत आम्हाला थर्ड अम्पायर मिळाला असता तर आजचे चित्र बदलले असते, असे राज ठाकरे म्हणाले.दरम्यान मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रमात ते बोलले. रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी भाषण केलं. यावेळी मंचावर सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होता.