विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे सरकार खेळीमेळीच्या वातावरणात स्थापन होणार असून इतके बहुमत युती सरकारला याआधी कधी मिळाले नव्हते. माझ्या नाराजीच्या फक्त चर्चा सुरू आहेत, असे स्पष्ट करत शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा आहे, असे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतरच्या पत्रकार परिषद देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले, अडीच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या नावाची शिफारस केली होती. आज मी त्यांची मुख्यमंत्रिपदासाठी शिफारस केली आहे. शिवसेनेने फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला आहे. मागील अडीच वर्षात एक टीम म्हणून आम्ही काम करत होतो. मला काय मिळाले. यापेक्षा राज्यातील जनतेला काय देऊ शकतो, याचा विचार करून काम केले.
माझ्या नावाच्या शिफारसीबद्दल शिंदेंचे आभार : फडणवीसआम्ही आज राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेसाठी पत्र दिले. महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. आम्हाला उद्या सायंकाळी साडेपाचची शपथविधीसाठी वेळ दिली आहे. शिवसेनेचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांनी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी माझ्या नावाची शिफारस केली. तसे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले आहे. त्याबद्दल शिंदे यांचे विशेष आभार. तर राष्ट्रवादी अजित पवार यांनीही त्याच आशयाचे पत्र राज्यपालांना दिले आहे. त्यासाठी राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे,असे फडणवीस यांनी सांगितले.
महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पाहण्यासाठी
खालील फोटोवरती क्लिक करा.
महाविकास आघाडीने प्रकल्प थांबविले होते. आम्ही मार्गी लावले. सरकार हे सर्वसामान्यांसाठी असते. अनेक कल्याणकारी योजना मार्गी लावल्या. आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या कल्याणकारी योजना राबविल्या नव्हत्या. त्या आम्ही राबविल्या याचा आनंद आहे, असे शिंदे म्हणाले.