तबल्याचे उस्ताद काळाच्या पडद्याआड ; झाकीर हुसैन यांचे निधन

Admin
तबल्याचे उस्ताद काळाच्या पडद्याआड 
झाकीर हुसैन यांचे निधन
हॅलो प्रभात 
प्रसिद्ध तबलावादक, तबल्याचे उस्ताद झाकीर हुसैन यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हुसैन यांच्यावरअमेरिकेतील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यासाठी त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण अखेरीस त्यांची झुंज अपयशी ठरली आणि झाकीर हुसैन यांची प्राणज्योत मावळली.मागील वर्षापासून झाकीर हुसैन यांना हृदयविकाराचा त्रास होत होता. त्यावर ते उपचारही घेत होते. काही वेळापूर्वी त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली होती. उस्ताद झाकीर हुसैन यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने भारतीय संगीतविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


झाकीर हुसैन यांना देश-विदेशातील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना भारत सरकारने 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण, 2023 मध्ये पद्मविभूषण यासारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.झाकीर हुसैन यांना 1990 मध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कारही मिळाला होता.2009 मध्ये 51 व्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उस्ताद झाकीर हुसैन यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, त्यापैकी त्यांना हा पुरस्कार चार वेळा मिळाला होता.
To Top