राहुल गांधी यांच्यावर संसदेतील
धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल
दिल्ली : हॅलो प्रभात
काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांची संसदेतील कथित धक्काबुक्की प्रकरणानंतर एकमेकांविरोधात संसद मार्ग पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान रात्री दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून धमकी देणे, जाणीवपूर्वक दुखापत पोहोचवणे यांसह इतर कलमे लावण्यात आली आहेत.
दरम्यान लोकसभा अध्यक्षांनी संसदेत आणि प्रवेशद्वारावर कोणतंही निदर्शने करण्यासाठी मनाई केलीय. शिवाय कोणताही खासदाराला अडवणूक करता येणार नसल्याचा आदेशही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला आहे. राहुल गांधी यांच्यावर पोलिसांनी कलम ११७ः जाणून बुजून दुखापत पोहोचवणे, कलम ३ (५): सामुहिक पणे गुन्हा करणे, कलम ११५ः दुखापत करण्याच्या उद्देशाने कृत्य करणे, कलम १२५ः खाजगी सुरक्षेला जोखीम मध्ये टाकणे, कलम ३५१ः धमकी देणे, कलम १३१ः धक्का देणे आणि भिती घालणे याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.