उत्स्फूर्त प्रतिसाद
लोणी काळभोर : हॅलो प्रभात
जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु, शांतिदूत गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान आनंद अनुभूती शिबिर (हॅप्पिनेस प्रोग्राम) मधुबन लॉन्स,लोणी काळभोर, सोलापूर-पुणे हायवे येथे आयोजित करण्यात आले.या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये योग,प्राणायाम,आणि ध्यान शिकवण्यात आले.तसेच या शिबिराने तणावमुक्त मन आणि आरोग्यदायी शरीर, भावनांवर नियंत्रण आणि स्थिरता आत्मविश्वासउत्साह वृद्धी, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होणे, कार्यक्षमता वाढ, नातेसंबंध सुधारणा या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले.
या शिबिरामधील विशेष आकर्षण म्हणजे सुदर्शन क्रिया जी जगप्रसिद्ध आहे आणि शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी खूप प्रभावी ठरते. प्रशिक्षित तज्ञ शिक्षक अंबर पोकळे,वामाक्षी पोकळे,डाॅ. अर्चन सिंग यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.यामध्ये प्रमुख स्वयंसेवक संदीप भुजबळ,साहील टिळेकर,नारायणी मेत्रे,आनंद संभाजी काळभोर, सोहम पालकर, हनुमंत पाटील व इतर संयेसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.