संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर ; हे दिग्गज नेते घेणार मंत्रिपदाची शपथ...

Admin
संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर 
हे दिग्गज नेते घेणार मंत्रिपदाची शपथ... 
मुंबई : हॅलो प्रभात 
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार ?  कोणाचे किती आमदार मंत्री म्हणून शपथ घेणारे ? खाते वाटपाचा फॉर्म्युला काय असणार आणि कोणत्या पक्षांकडे कोणती खाती जाणार? अशा चर्चाना उधाण आले आहे.
राज्याचं मुख्यमंत्रिपद हे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार असल्याचे  निश्चित झाल्यानंतर आता आपल्या पदरात जास्तीत जास्त मंत्रिपदं पाडून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून केला जात आहे. शपथविधीसाठी अवघे काहीच तास शिल्लक असताना महायुतीतील तीनही पक्षांच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी समोर आली आहे. मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला असला तरी उपमुख्यमंत्रिपदावर मात्र अद्याप स्पष्टता नाही. एकीकडे अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार हे जवळपास निश्चितच आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार की नाही याची स्पष्टता मात्र नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृह, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातं हवं असल्याची माहिती समोर येत आहे.




शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे

भाजपचे संभाव्य मंत्री
  • रविंद्र चव्हाण
  • नितेश राणे
  • गणेश नाईक
  • मंगलप्रभात लोढा 
  • आशिष शेलार
  • राहुल नार्वेकर
  • अतुल भातखळकर
  • शिवेंद्रसिंहराजे भोसले
  • गोपीचंद पडळकर
  • माधुरी मिसाळ
  • राधाकृष्ण विखे पाटील
  • चंद्रशेखर बावनकुळे
  • संजय कुटे
  • गिरीश महाजन
  • जयकुमार रावल
  • पंकजा मुंडे
  • अतुल सावे

राष्ट्रवादी संभाव्य मंत्री यादी
  • अजित पवार
  • आदिती तटकरे
  • छगन भुजबळ
  • दत्ता भरणे
  • धनंजय मुंडे
  • अनिल भाईदास पाटील
  • नरहरी झिरवळ
  • संजय बनसोडे
  • इंद्रनील नाईक
  • संग्राम जगताप
  • सुनिल शेळके
  • हसन मुश्रीफ


राष्ट्रवादीला 11 मंत्रिपदं द्या : अजितदादांची मागणी
शपथविधीला दोन दिवसांपेक्षाही कमी अवधी बाकी असताना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शाहांकडे 11 मंत्रिपदाची मागणी करणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीला राज्य सरकारमध्ये 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदं हवी असल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय प्रफुल पटेलांसाठी केंद्र सरकारमध्ये एक कॅबिनेट पद, तसंच पक्षातील वरिष्ठ नेत्यासाठी राज्यपाल पदाचीही राष्ट्रवादीची मागणी असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय.
Tags
To Top