जनसेवक दत्तात्रय लोखंडे यांना लोकवर्गणीतून गाडी देण्याचा निर्धार

Admin
जनसेवक दत्तात्रय लोखंडे यांना लोकवर्गणीतून
 गाडी देण्याचा निर्धार
सांगली : हॅलो प्रभात
समाजरत्न फौंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले जनसेवक दत्तात्रय लोखंडे यांना लोक वर्गणीतून गाडी देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. चोरोची ता. कवठेमहांकाळ येथून सुरू झालेले कार्य जिल्ह्यासह राज्यभर विस्तारण्यासाठी दत्तात्रय लोखंडे यांना चारचाकी गाडी देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. दत्तात्रय लोखंडे हे उच्च शिक्षित युवा कार्यकर्ते असून एक चांगले कराटेपट्टू, योग शिक्षक आहेत. तसेच त्यांनी समाजरत्न फौंडेशन या संस्थेच्या माध्यमातून अल्पावधीत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी कोरोना काळात शेकडो रुग्णांना जेवणाचे डबे पुरविले. महामार्गावर घडणाऱ्या अपघातातील आपदग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी धावून जातात. तसेच कार्यक्षम अधिकारी आणि यशवंत व गुणवंत युवक यांच्या पाठीवर थाप टाकत संस्थेच्या वतीने सन्मान करून प्रोत्साहित करत असतात.


दत्तात्रय यांचे हे कार्य गतीने पुढे जावे, यासाठी त्यांचेकडे चारचाकी गाडी असायला हवी, ही गरज ओळखून ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे, माजी सभापती अजित  कारंडे,नगराध्यक्ष विजय गावडे,उद्योजक कृष्णा रुपनर, उदयोजक संभाजी लोखंडे, उदयोजक संभाजी खांडेकर आदींनी लोकवर्गणीतून गाडी देण्याचा निर्धार चारचाकी गाडी प्रदान करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी ढालगाव पंचक्रोशीतून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दत्ता लोखंडे यांच्या सामाजिक तळमळ असलेल्या कार्याला उभारी मिळणार आहे. अशा उपक्रमातूनच समाजाची आणि नेतृत्वाची जडणघडण होत असते.
To Top