चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून खून ; खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवण्यासाठी प्रयत्न

Admin
चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून खून
खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवण्यासाठी प्रयत्न : पोलिस अधीक्षक संदीप  घुगे
 

सांगली : हॅलो प्रभात
मिरज तालुक्यातील करजगी या गावात चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याचे पोलिस आणि वैद्यकीय तपासातून स्पष्ट झाले आहे. आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी बारकाईने तपास केले जाणार असून
सदर गुन्हा हा न्यायालयात फास्ट ट्रॅक पद्धतीने चालविणेबाबत पाठपुरावा केला जाईल न्यायालयास विनंती करण्यात येणार आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास उपअधीक्षक सुनिल साळुंखे यांच्याकडे दिला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत काय म्हणाले पोलिस अधीक्षक ? ☝ 

अधीक्षक घुगे पुढे म्हणाले, गुरूवारी दुपारी एक वाजता करजगी येथील चार वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची माहिती उमदी पोलिस ठाण्यास मिळाली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात शोध मोहिम राबवली असता, आरोपी पांडुरंग याच्या हालचाली आम्हाला संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन घराची झडती घेतली. तेव्हा त्याने बालिकेचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह पोत्यात घालून पत्र्याच्या लोखंडी पेटीत ठेवल्याचे आढळले. शवविच्छेदन केल्यानंतर बालिकेवर अत्याचार करून खून केल्याचे स्पष्ट झाले. 

दरम्यान आरोपी पांडुरंग कळ्ळी (वय ४५ रा. करजगी) याची पत्नी त्याच्यापासून २० वर्षापूर्वीच विभक्त झाली आहे. याआधी २०१६ मध्ये त्याच्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्यामुळे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे.  तो तीन वर्षे कारागृहात होता. असेही अधीक्षक घुगे  यांनी सांगितले. यावेळी गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते.

Tags
To Top