'आप' ला धक्क्यावर धक्के ; माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसह मनीष सिसोदियांचाही पराभव |
नवी दिल्ली : हॅलो प्रभात
नुकत्याच हाती येत असलेल्या कालांनुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. पक्षाचे मुख्य नेते तसेच माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला असून भाजपचे परवेश वर्मा यांनी यांच्यावर मात केली. याआधीच आपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला. दरम्यान विद्यमान मुख्यमंत्री आतिशींनी पक्षाची लाज राखली असून, त्या कालकाजी मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. येथून काँग्रेसकडून अलका लांबा तर भाजपकडून रमेश बिधुरी यांचे आव्हान होते.
दरम्यान, केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणुक लढवित होते. त्यांच्यासमोर भाजपच्या परवेश वर्मा आणि काँग्रेसच्या संदीप दिक्षीत यांचे आव्हान होते. आपने माजी उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया हे जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवित होते. तेथे भाजपकडून तरविंदर सिंग मारवाह आणि काँग्रेसकडून फरहाद सुरी यांचे आव्हान होते. दरम्यान सिसोदिया यांचा पराभव झाला असून या जागेवर भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी 1844 मतांनी विजय मिळवला आहे.