![]() |
मराठी माणूस मोदींच्या पाठीशी ; केजरीवालांच्या खोट्या राजकारणाचा बुरखा फाटला : देवेंद्र फडणवीस |
पुणे : हॅलो प्रभात
दिल्ली विधानसभेवर २७ वर्षांनी भाजपचा झेंडा रोवला गेला असल्याने मला अतिशय आनंद आहे. दिल्लीतील भाजपच्या तमाम कार्यकर्त्याचा आणि जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीकरांनी हा विश्वास पंतप्रधान मोदी यांच्यावर दाखवला आहे. या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला असून सातत्याने खोटी आश्वासने देऊन आणि लोकांना भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झाला आहे, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले. ते भाजपच्या दिल्लीतील विजयानंतर पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. ![]() |
☝ पहा मुख्यमंत्र्यांची संपुर्ण पत्रकार परिषद ☝ |
फडणवीस पुढे म्हणाले, दिल्लीतील मराठी माणूस हा मोदींच्या मागे उभा आहे, दिल्लीमध्ये 27 वर्षांनी भाजपने सत्ता मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या जनतेचं अभिनंदन केलं.
'एक है तो सेफ है' हा नारा दिल्लीमध्येही चालला आहे. हा नारा आता देशाने स्वीकारला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.