धनंजय मुंडेंना सहआरोपी करुन तत्काळ चार्जशीट दाखल करा ; सांगलीत काँग्रेसची निदर्शने

Admin
धनंजय मुंडेंना सहआरोपी करुन तत्काळ चार्जशीट 
दाखल करा; सांगली शहर जिल्हा काँग्रेसची निदर्शने 

सांगली : हॅलो प्रभात
बीड जिल्ह्य़ातील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची आवादा कंपनी खंडणी वसूली प्रकरणी अमानुष मारहाण करुन त्यांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. याप्रकरणी हत्या करण्यात आली त्यावेळचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सहभागाविषयी विधीमंडळातील आरोप व प्रसार माध्यमांनी दिलेल्या बातम्या लक्षात घेता हे प्रकरण फारच गंभीर असल्याने केवळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन हा विषय संपत नाही तर त्यांना या प्रकरणी सहआरोपी करुन त्यांच्यावर ३०२ कलमाखाली कारवाई करण्यात यावी. त्यासाठी सुधारीत चार्जशीट दाखल करुन पारदर्शक तपास करावा या मागणीसाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करुन निषेध आंदोलन करण्यात आले.धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करा, त्यांची आमदारकी रद्द करा, काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
 

यावेळी बिपीन कदम, एन.डी.बिरनाळे, रामभाऊ पाटील, मौला वंटमुरे,आशिष चौधरी, आनंदराव पाटील, उत्तम सुर्यवंशी, प्रमोद सुर्यवंशी, ओंकार चिखले, शीतल सदलगे, मयूर पेडणेकर, अजिज मेस्त्री, राजेंद्र कांबळे, प्रशांत अहिवळे, अल्ताफ पेंढारी, विजय आवळे यांच्यासह  कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
To Top