अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने पतीचा प्रियकराच्या मदतीने खून

Admin
अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने
पतीचा प्रियकराच्या मदतीने खून
 

लोणी काळभोर : हॅलो प्रभात
अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी रस्त्यावरील वडाळे वस्ती परिसरात घडली असून मंगळवारी (ता.1) सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या गुन्ह्याची उकल करून लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या तीन तासाच्याआत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.


याबाबत रवींद्र काळभोर (वय 45) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून  शोभा रविंद्र काळभोर (वय ४२) आणि  गोरख त्र्यंबक काळभोर (वय 41) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रवींद्र यांचे भाऊ भाऊसाहेब काळभोर  यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र व शोभा काळभोर हे नात्याने पतीपत्नी आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. रवींद्र हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. रवींद्र यांना मद्याचे व्यसनही होते. दरम्यान, मंगळवारी (ता.1) सकाळी रवींद्र हे घराच्या बाहेरील पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात जखमी व बेशुध्द अवस्थेत आढळून आले.


पोलिसांनी तपासाला सुरवात केली असता, शोभा यांचे गोरख यांच्याशी अनैतीक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले. दोघांनाही ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, अनैतीक संबंधात अडसर होत असल्याने रवींद्र यांचा कायमचा काटा काढायचा आरोपींनी कट रचला होता. त्यानुसार सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमरास रवींद्र हे पलंगावर झोपलेले असताना, दोन्ही आरोपींनी संगनमत करून त्याच्या डोक्यात फावड्याने वार करून खून केला. अशी कबुली दोन्ही आरोपींनी दिली.  अवघ्या ३ तासांत आरोपी निष्पन्न करुन, पोलीसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.

Tags
To Top